ताईंबद्दल

डॉ. सौ. कुंदाताई यांच्याबद्दल

डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे या पिंपरी चिंचवड शहरातील एक सक्षम, संवेदनशील आणि जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात, वारकरी संप्रदायाच्या संस्कारात झाला. बालपणापासूनच समाजाविषयीची जाणीव, अध्यात्माची आवड आणि सेवाभाव त्यांच्या मनात रुजला.

श्री. संजय तात्याबा भिसे यांच्याशी विवाहानंतर त्या भिसे परिवाराचा भाग बनल्या. सामाजिक बांधिलकी जपणारा आणि कष्टाच्या जोरावर उभा राहिलेला हा परिवार त्यांच्या कार्याचा भक्कम आधार ठरला. याच प्रेरणेतून २०१८ साली त्यांच्या पुढाकाराने "उन्नती सोशल फाऊंडेशन" ची स्थापना झाली.

समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे विविध उपक्रम राबवत, उन्नती आज पिंपरी चिंचवडमधील एक अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाते.

सामाजिक कार्याच्या या प्रवासातूनच त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनही विश्वास संपादन केला. २०२६ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर – रहाटणी) मधून त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या.

सध्या त्या महानगरपालिकेच्या विधी समिती सदस्य म्हणून कार्यरत असून, भाजपा महिला मोर्चा, चिंचवड विधानसभा यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्या समर्थपणे पार पाडत आहेत.

कुंदाताई या केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्यांची ओळख एक संस्कारी, कलावंत आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व अशीही आहे. त्या संगीत विशारद असून, त्यांना गायनाची विशेष आवड आहे.

विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या मधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे आणि ज्ञानेश्वरीचे निरूपण करून त्या अध्यात्मिक परंपरेचे जतन करत आहेत.

आपुलकी, ममत्व आणि सहज संवाद या त्यांच्या गुणांमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक त्यांना प्रेमाने "ताई" म्हणून संबोधतात. जनतेच्या प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देणारे, विकास आणि सेवा यांना समान महत्त्व देणारे त्यांचे नेतृत्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.